आज शब्द कुठेतरी एकांतात बसुन विचार करू लागलेत,
व्यक्त होण्यासाठी मार्ग शोधू लागलेत,
बोलण्यासाठी खूप काही असूनही, ऐकणारे मात्र लुप्त होऊ लागलेत,
विचार करून करून स्वतः मध्येच रमायला शिकू लागलेत,
काय करावे, जेव्हा समजून घेणारेच भेटेनासे झालेत.
मार्ग तर भेटायला हवा ना, विचार हे व्यक्त व्हायलाच हवे, असे किती दिवस चालणार, एकट्या मध्ये असे किती दिवस झुरत बसणार.
म्हणूनच आज blog लिहायला घेतला, म्हटलं, शब्दांना मार्ग भेटला.
मी मीरा, लिहण्याची आवड तशी लहानपणापासून आहे, पण या ना त्या कारणाने हा छंद कधी जोपासला नाही, कधी वाटले की आपण खरंच लिहू शकणार का?, तर कधी वाटले की आपल्या लिखाणाचा दर्जा हा योग्य चौकटीत बसेल का?, तर कधी लिहायला सुरुवात केली की, ती अर्ध्या मध्येच कुठेतरी सोडून दिली. मात्र आज पुन्हा नव्याने सुरुवात करते आहे, अपेक्षा एवढीच की मी निरंतर खंड ना पाडता लिखाण करेल.
असे नाही आहे की मी कधीही सकारात्मक नव्हते लिखाणाबद्दल. मोठी मोठी स्वप्ने रंगवली होती, जसे की एखादे पुस्तक प्रकाशित करेल वगैरे. आशा आहे की मी माझे हे स्वप्नं लवकरच पूर्ण करेल.
आज मला या स्वतः मध्ये असणाऱ्या असीम शक्ति बद्दल साक्षात्कार झाला, तर झाले असे की, मी माझ्या वयक्तिक जीवनामध्ये काही संघर्षांचा सामना करत होती, एक वेळ अशी झाली होती की मी पूर्णतः एकटे पडले, काही सुचत नव्हते की काय करावे ते, अगदी पूर्णतः तुटले होते. रडण्यासाठी पण एक कुठलातरी कोपरा शोधून, कोणी आजूबाजूला नाही आहे याची खात्री करून मग रडायचे.
अशा वेळी मी, जी धर्मकार्यात एवढेसे ना डोकावणारी, त्या वेळी देवी आईला शरण आले. आणि म्हटलं आजवर जे तू मला सांभाळलं आहे त्या बद्दल खूप ऋणी आहे मी, पण सध्या जी परिस्थिती माझ्यावर ओढावली आहे, ज्याचे कारण मला कळत नाही आहे, का मला दुःखाचा सामना करावा लागत आहे ते देखील कळत नव्हते, मी जी सर्वाचे चांगले व्हावे म्हणून धडपडणारी आज एकटी का पडले या प्रश्नाचे उत्तर शोधत आहे.
आणि मनात चाललेला हा गोंधळ कोणालाही सांगता येत नव्हता, हे एक कसे बंधन आहे तेदेखील समजत नव्हते.
त्या वेळी मला एकच मार्ग दिसला, सापडला, कि माझ्यासाठी म्हणून खुला झाला, माहीत नाही. पण त्यामुळे आशेचा एक सुखद किरण मला भासत होता, आणि तो मार्ग म्हणजे भक्तिमार्ग, इश्र्वराप्रती सेवाभाव.
बास मग काय रोज मी न चुकता पूजापाठ तसेच नामस्मरण, नामजाप या सगळ्या गोष्टींकडे वळले आणि कधी मी देवाबरोबर संवाद साधता साधता स्वतः ला भेटले कळलेच नाही.
कदाचित हीच देवाची कृपा असावी की, देव किंवा ईश्वप्राप्ती व्हावी म्हणून धडपड करण्याच्या प्रवासात जो व्यक्ती स्वतःचे अस्तित्व शोधतो ना, अगदी हाच तर देवाच्या कृपेचा वर्षाव आहे, ईश्वरप्राप्ती आहे.
आणि देव हा आपल्या आत आहे हे का म्हणतात हे मला आज कळले, त्यामुळेच जर आपणास ईश्वर सेवा करायची असेल तर ती न चुकता रोज करावी.
कशी काय, आताच तर सांगितलें ना स्वतःची शक्ति साक्षात्कार होईल, म्हणजेच काय तर रोज स्वताला तयार करायचे, या शरीराला धन्यवाद द्याचे, आणि त्याची योग्य अशी काळजी घ्यायची, या मनाला शुद्ध विचारच द्यायचे आणि शक्य तितके प्रसन्न राहायचे म्हणजेच आपण ईश्वराला प्रसन्न ठेवतो आहे याचा आपसूकच भास होईल.
म्हणजेच काय तर, रोज आपण सर्वात आधी स्वतःला मान, सन्मान, आदरभाव, प्रेम तसेच स्वतःच्या मन शांतीसाठी प्रयत्नशील असावे, आपल्या शरीराची योग्य ती काळजी घ्यावी, नामजप यासाठी की त्यामुळे आपण अवतीभोवती चे नकारात्मक तसेच अयोग्य गोष्टी दुर्लक्ष करून स्वतःला योग्य मार्गाला नेतो, व इतर कुठलेही चुकीचे विचार टाळल्या जातात आपसूकच. त्यामुळे आपण प्रसन्न तसेच स्वतःशी जोडलेले जातो व वर्तमानकाळात संपूर्ण लक्ष केंद्रित होण्यास मदत भेटते. आणि हीच खरी ईश्वरसेवा आहे, स्वताला प्रसन्न ठेवणे म्हणजेच ईश्वराला प्रसन्न ठेवणे.
आणि जो मी एक प्रश्न या ब्रम्हांड शक्ति समोर मांडला होता की मी सर्वांसाठी एवढे चांगले चिंतते, एवढं धडपडत असते तरी देखिल माझ्याबरोबरच मला समजून घेणारी व्यक्ती का नाही आहे कोणी, आणि दुःखांचा सामना का करावा लागत आहे? तेव्हा मला असे उत्तर मिळाले की, तू काहीही चुकीचे करत नाही, मात्र या सर्वामध्ये जे तू मला विसरलीस त्याची आढवण व्हावी म्हणून थोडेसे दुःख तुझ्या वाटेला आले, म्हणजेच तुला तुझ्याच अस्तित्वाची जो विसर पडला होता तो मला अजिबात मान्य नाही, तू माझी म्हणजेच स्वतःची काळजी घ्यावी आणि स्वतःला आनंदी ठेवावे, देवधर्माबरोबरच स्वताला ओळखावे आणि कुठल्याही किमतीवर स्व-अस्तित्वाशी तडजोड नाही करावी हीच अपेक्षा.
आणि अशा प्रकारे स्वतः वर प्रेम करावे हे मी रोज शिकते आहे आणि स्वताला नव्याने शोधते आहे, तसेच स्वीकारते आहे की मी नेमकी कोण आहे.
#मराठी #marathi #marathiblog #शोध #विचार #ईश्वर #blogger #ब्लॉग #newblog #maharashtra