आज मला कळले की भाग्यवान असणे म्हणजे काय असते ते, आज जेव्हा मी अशा दुविधा मध्ये आहे जिथे मला काळत नाही कि मी काय करावे, काय बोलावे, कसे वागावे तिथे मी स्वताला हरवून बसले आणि एका तणावात असल्यासारखे वावरत होते, तिथे मला अश्रू ओसरत असताना एक छोटासा अलगद हात माझ्या जवळ येतो, "काय झाले?" असं विचारते, तेव्हा जे भाव येतो तो शब्दांत मांडण्या पलीकडचा आहे, माझी छोटीसी पण माझ्याहून ही मोठी समजदार माझी दोन वर्षाची मुलगी!
देवाने किती सुख, आशीर्वाद माझ्या पदरात टाकलंय हे आज कळालं, चिमुकली ती, आणि तोतरे बोलणे तरी देखिल सर्व दुःख पळवून लावून, फक्त निखळ आनंदाची अनुभती करून देते. खूप खूप धन्यवाद ईश्वराला की माझ्याकडे गोड गोंडस मुलीला सांभाळ करण्यासाठी, वाढ करण्यासाठी आणि मोठे करण्यासाठी माझी आई म्हणुन निवड केलीस आहे ते. मी खूप खूप भाग्यवान आणि सामर्थ्यवान आहे याची जाणीव करून दिली ते.
No comments:
Post a Comment